DISTRICT SETU COMMITTEE, NANDED

COLLECTOR OFFICE NANDED

अर्ज तपासणीचे विविध टप्पे

  1. सर्व प्रथम अर्जासोबत जोडलेल्याा कागदपत्राच्या आधारे प्राथमिक पात्र/अपात्र ची यादी दिनांक 06/10/2023 रोजी सायंकाळी 5.00 वा. नांदेड जिल्हंयाच्या संकेतस्थळावर https://nanded.gov.in वhttps://setunanded.in प्रसिध्द करण्यात येईल.
  2. पात्र/अपात्र यादीवरील अक्षेप दिनांक 09/10/2023 ते दिनांक 13/10/2023 रोजी सायंकाळी 05.00 वा. पर्यंत ऑनलाईन सादर करावीत. सदरची सुविधा ऑनलाईन अर्ज केलेल्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. आपण यापुर्वी तयार केलेला युजरआयडी व पासवर्डचा वापर करून अक्षेप दाखल करू शकता. इतर मार्गाने प्राप्त अक्षेपांचा विचार केला जाणार याची नोंद घ्यावी.
  3. पात्र/अपात्र यादीवरील अक्षेपावर दिनांक 19/10/2023 रोजी दुपारी 12.00 वा. जिल्हााधिकारी कार्यालय, नांदेड येथे सुणावणी घेण्यावत येईल. सुणावणीस हजर राहतांना आवश्याक कागदपत्रे सोबत आणावीत.
  4. सुणावनी नंतर दिनांक 27/10/2023 रोजी सायंकाळी 05.00 वा. अंतिम पात्र/अपात्र यादी नांदेड जिल्हयाच्या संकेतस्थळावर https://nanded.gov.in व https://setunanded.in प्रसिध्द् करण्यात येईल.
  5. प्रत्येक गावासाठी एक आपले सरकार सेवा केंद्र मंजुर करण्याीसाठी जिल्हा सेतू समितीच्या बैठकीमध्ये पात्र अर्जांची निकषानूसार निवड करून अंतिम मान्याता प्रदान करण्यात येईल.
  6. अंतिमः मंजुर करण्यात आलेल्या आपले सरकार सेवा केंद्र चालकांना अर्जासोबत सादर केलेल्या कागदपत्रांच्यात मुळ प्रतिसह तपासणीसाठी जिल्हा सेतू समिती, नांदेड येथे बोलविण्यांत येईल. मुळ कागदपत्रांच्या तपासणीसाठीचा दिनांक व वेळ नांदेड जिल्हयाच्या संकेतस्थ्ळावर https://nanded.gov.in वेगळयाने प्रसिध्द करण्यात येईल, याकामी अर्जदारांनी या कार्यालयास भेट देवू नये.
  7. कागदपत्र तपासणीसाठी येतांना प्रत्येक मंजूर केंद्र चालकांने कोणत्याही राष्ट्रीयकृत बॅंकेचा रक्कम रू.20,000/- चा धनाकर्ष “E-SUVIDHA COLLECTORATS NANDED” या नावाने अनामत (Deposit) म्हणुन जिल्हा सेतू समिती, जमा करावे लागेल , अन्यथा आपणास मंजुर करण्यात आलेले केंद्र रद्द करण्यात येईल.
  8. तद्दनंतर आपले सरकार सेवा केंद्राचा आयडी उपलब्ध होण्य्साठी प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयास पाठविण्यात येईल. वरिष्ठ कार्यालयाकडून केंद्रचालकास अर्जांत नमुद केलेल्या ई-मेल आयडीवर युजर आयडी व पासवर्ड प्राप्त होतील. त्यामुळे अर्जदारांनी आपला मेल आयडी व मोबाईल क्रमांक अचुक नमुद करावा. चुकीचा मेल आयडी नमुद केल्याास त्याची सर्व जबाबदारी अर्जदाराची असेल.
  9. आपले सरकार सेवा केंद्र मंजुर झालेल्या केंद्र चालकांनी 01 महिन्याीत संबंधित पोलीस स्टेशनचे चारीत्र्य प्रमाणपत्र या कार्यालयास सादर करणे बंधनकारक असेल. संबंधित पोलीस स्टेशनचे चारीत्र्य प्रमाणपत्र प्रत 01 महिन्याचे आत या कार्यालयास सादर न केल्यांस अर्जदारास मंजुर करण्याचत आलेले आपले सरकार केंद्र रद्द करण्याात येईल.
  10. उपरोक्त सर्व प्रक्रियेसाठी आपण वेळोवेळी https://nanded.gov.in व https://setunanded.in या संकेतस्थरळावर भेट दयावी.